Weather Update: राज्यात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, हवामान अंदाज

Weather Alert: येत्या चार दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.The state is expected to receive torrential rains with gusty winds for the next four days, the meteorological department warned

मुंबई : या आठवड्यात मोसमी पाऊस राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

येत्या चार दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.यामध्ये कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


हे वाचलंत का?


दरम्यान परतीचे वेध लागलेल्या मान्सूनने सोमवारी रात्री पुणे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला. अतिमुसळधार पावसामुळे अवघ्या एक ते दोन तासांमध्ये पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणीपाणी झाले होते.

पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत.काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.

पंजाब डख हवामान अंदाज । Punjab Dakh Weather Report

The state is expected to receive torrential rains with gusty winds for the next four days, the meteorological department warned

नावके.एस.होसाळीकर हवामान अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai
दिनांक5 ऑक्टोबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

4 thoughts on “Weather Update: राज्यात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, हवामान अंदाज”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top