Weather Update: यंदाच्या वर्षी लांबलेल्या मान्सूनचा (Monsoon 2021) परतीचा प्रवास सुरु झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून पतरण्यासाठी गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार महाराष्ट्राच्या काही भागात पोषक वातावरण तयार झालंय. त्यामुळं पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागणार आहे. Havaman Andaj Today Live
यंदा राज्यासह देशभरात समाधानकारक पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड़्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अतोनात नुकसान झालं. त्यातल्या त्यात एक दिलासादायक बाब म्हणजे राज्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे.
यंदा सप्टेंबरमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अखेरच्या आठवड्यातील चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास लांबला. हा परतीच्या पावसाचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रेंगाळलेला प्रवास आहे.

राज्यात गेल्या काही दिवसापासून चक्रीवादळांनीं मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सर्वात आधी बंगालच्या उपसागरात तयार झालेले गुलाब चक्रीवादळ, त्यानंतर अरबी समुद्रातील शाहीन चक्रीवादळ आणि आता जवाद चक्रीवादळाने हजेरी लावली आहे.
दरम्यान आजही राज्यातल्या अनेक भागात परतीच्या पावसानं हजेरी लावली. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक शहरात वीजांसह पाऊस झाला. संगमनेर शहरातील नवीननगर रोड परीसरात तर तळ्याचं रुप आलं होतं. उत्तर पुणे जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर, तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपलं. तिकडे नाशिक जिल्ह्यात नाशिक शहरासह दिंडोरी आणि येवला तालुक्यात तास दीड तास पावसानं शेतांना तळ्याचं रुप आणलं.
हे पण वाचा
हे पण वाचा:
- Havaman Andaj Today | इथे चक्रीवादळाचे संकेत; ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
panjab dakh havaman andajj today – पंजाब डख हवामान अंदाज
| नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
|---|---|
| विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई – Jawad Chakrivadal Update |
| पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
| दिनांक | 10 ऑक्टोबर 2021 |
| फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
| हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!







