× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Gulab Chakri Vadal: अखेर ‘गुलाब’ चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक किनाऱ्याला धडकले

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Gulab Chakri Vadal gulab cyclon gulab chakrivadal
Summarise this post with:

गुलाब चक्रीवादळ: बंगालच्या उपसागरात घोंगावणारे ‘गुलाब’ चक्रीवादळ (Gulab Chakri Vadal) रविवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणम पासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले.

पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे ‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणम पासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले. आज (ता. २७) ही वादळी प्रणाली महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात येण्याचे संकेत आहेत.

Gulab Cyclone Update

Havaman Andaj Today gulab cyclon gulab chakri vadal

राज्यात २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २४) तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढल्याने शनिवारी (ता. २५) रात्री ‘गुलाब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. पूर्व किनाऱ्याकडे वेगाने झेपावणारे चक्रीवादळ ओडिशाच्या गोपाळपूर, आंध्रप्रदेशच्या कलिंगापट्टणम दरम्यान धडकली. ही प्रणाली जमिनीवर येण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

K.S. Hosalikar Weather Forecast on Gulab Cyclone

Gulab Chakri Vadal

त्यामुळे पूर्व किनाऱ्यालगतच्या असलेल्या समुद्रात उंच लाटा उसळण्यास सुरवात झाली. तसेच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे.  चक्रीवादळामुळे पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणामध्ये स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

हे पण वाचा:

महाराष्ट्रात दोन दिवस जाणवणार प्रभाव

जमिनीवर आल्यानंतर वादळाची तीव्रता ओसरणार असून, आज (ता. २७) ही प्रणाली विदर्भापर्यंत पोचण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दोन दिवस प्रभाव जाणवणार आहे, या काळात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात सोमवारी (ता. २७) विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात, तसेच मंगळवारी (ता. २८) कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Source -Agrowon

नावभारतीय हवामान विभाग महाराष्ट्र राज्य यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक26 सप्टेंबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021
Gulab Chakri Vadal

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख यांचे अपडेट व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.

Summarise this post with:
WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon