हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

imd alert : शेतकऱ्यांची चिंता वाढली, हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा

Latest Weather Alert for Maharashtra: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. आता हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. हवामान विभागाने दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचा इशारा; ऐन थंडीत ‘या’ जिल्ह्यांना बसणार अवकाळी पावसाचा तडाखा

नवी दिल्ली : हवामन विभागाच्या ४ ते ५ दिवसांचा अंदाज जाहीर करत इशारा दिला आहे. उत्तर भारतात थंडीच्या लाट वाढणार आहे. उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात किमान तापमान २ ते ३ अंशांनी घसरेल. तर १२ ते १५ जानेवारी दरम्यान, पंजाब, उत्तर राजस्थान, हरयाणा आणि चंदीगडमधील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   Weather Forecast : राज्यात पुन्हा पावसाचं थैमान, या ८ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज

शुक्रवारी म्हणजे १४ जानेवारीपर्यंत ओडिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी ओडिशा आणि तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. या आठवड्याच्या शेवटपर्यंत तामिळनाडू, कराईकल, पुद्दुचेरी, केरळ आणि माहे येथे गडगडाटी वादळाची शक्यता आहे.

देशाच्या उत्तर भागातून जाणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. असे आणखी दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स १६ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हिमालयाच्या पश्चिम भागात पुन्हा हलका पाऊस पडू शकतो.

वेस्टर्न डिस्ट्रबन्स म्हणजे काय?

वेस्टर्न डिस्टर्बन्स किंवा वेस्टर्न डिस्ट्रबेन्स विषुववृत्तीय क्षेत्रामध्ये येणारे उष्णकटिबंधीय वादळ. त्यामुळे हिवाळ्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या पश्चिम आणि उत्तर भागात अचानक पाऊस पडतो. जेव्हा जेव्हा वेस्टर्न डिस्टर्बन्स समुद्रावरून जातो तेव्हा वाऱ्यांमुळे चक्रीवादळ तयार होते. याला सायक्लोनिक परिसंचरण म्हणतात. या अभिसरणात हवा आणि आर्द्रता यांचे मिश्रण असते, ज्यामुळे पुढे पाऊस पडतो. हे वारे पश्चिमेकडून भारतात येतात म्हणून त्याला वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतात.

हे पण वाचा -   04 saptembar havaman andaj/आज महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस/punjab dakh /havaman

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात पाऊस आणि गरपिटीचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने दोन ते तीन दिवस नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील या ७ जिल्ह्यांना हवामान ( imd alert vidarbha ) विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. नागपूर, वर्धा, भंडाऱ्यात काही भागात मध्य स्वरुपाचा तर गडचिरोली, यवतमाळमध्ये जोरदार वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील काही जिल्हांमध्येही गारपिटीची शक्यता आहे. ११ ते १४ तारखेदरम्यान हा अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हे वाचलंत का?

हे पण वाचा -   पंजाब डख हवामान अंदाज - मराठवाडा व पूर्वविदर्भात दि.11 जानेवारी 14 जानेवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj