हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

IMD Report 11 July 2023 : महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी तुरळक आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

IMD Report : महाराष्ट्रात आज (मंगळवार, 11 जुलै 2023) अनेक ठिकाणी तुरळक पावसाची आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

IMD Report : महाराष्ट्रात आज (मंगळवार, 11 जुलै 2023) अनेक ठिकाणी तुरळक पावसाची आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकण आणि गोवा विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Weather today in Maharashtra

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील एक-दोन दिवसांपासून कोकण आणि गोवा विभागात उकाडा जाणवत आहे. पण तापमानातील ही वाढ मर्यादीत असेल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

हे पण वाचा -   All India Weather Update: उत्तर भारतात तापमानात वाढ, तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात ढगाळ वातावरणाची शक्यता

हे पण वाचा – Monsoon 2023 Update : राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात इथे हलका, तर या भागात मुसळधार पाऊस आज इथे यलो अलर्ट

India Meteorological Department

महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरीइतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कमी काळात पडलेला जास्त पाऊस किंवा राज्याच्या एका विभागात पडलेला अतिरिक्त पाऊस उर्वरित राज्याची पावसाची सरासरी भरून काढेल, अशीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

All Maharashtra weather forecast bulletin

प्रामुख्याने कोकण विभागातील पाऊस राज्याची पावसातची सरासरी भरून काढण्याची दाट शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या 12 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

हे पण वाचा -   आला रे मान्सून आला... ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून! । Maharashtra monsoon weather

District level weather forecast

पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात संमिश्र पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक11 जुलै 2023
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2023

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी खालील कोपऱ्यात येणाऱ्या बटनावर क्लिक करा.

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj