× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra rain IMD Alert: 14 मार्चपासून ‘इतके’ दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Maharashtra rain IMD Alert

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. 4 मार्च ते 8 मार्च पर्यंत बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात गारपिट देखील झाली. याशिवाय अहमदनगर, पुणे, नासिक, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस या कालावधीत पाहायला मिळाला.

यामुळे शेतकरी बांधवांचे काढणीसाठी आलेले रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच फळबाग आणि भाजीपाला पिके भुईसपाट झालीत. गारपिटीमुळे आणि वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अनुक्रमणिका

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

पंजाबराव डख हवामान अंदाज

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 14 मार्चपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस कोसळेल असा अंदाज बांधला आहे. डखं यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 14 मार्च ते 18 मार्चपर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे. संपूर्ण राज्यात भाग बदलत या कालावधीमध्ये पाऊस पडणार आहे. 18 मार्च नंतर देखील राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान राहील आणि पाऊस कोसळू शकतो. जवळपास 26 मार्चपर्यंत वातावरण खराबच राहील असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे.

विशेष बाब म्हणजे या कालावधीमध्ये तेलंगाना आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यात गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यवतमाळ आणि नांदेड तसेच इतर पूर्व विदर्भातील जिल्ह्यात या कालावधीमध्ये गारपीट होईल असा अंदाज पंजाब रावांनी बांधला असून गारपीटीची आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपली व आपल्या शेती पिकांची तसेच पशुधनाची काळजी घेण्याची गरज यावेळी निर्माण झाली आहे.

पंजाब रावांचा हवामान अंदाज ठरतोय खरा 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंजाबरावांनी 28 फेब्रुवारी रोजी एक हवामान अंदाज वर्तवला होता. त्यावेळी त्यांनी राज्यात 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्र अहमदनगर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर सह विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.

त्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता आणि 4 मार्च ते ८ मार्च दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस कोसळला होता. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली असल्याने हा देखील अंदाज जर सत्यात उतरला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. 

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक14 मार्च 2023
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2023

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon