Maharashtra Rain Update : आज राज्यात इथे मुसळधार पावसाचा इशारा ; या जिल्ह्यांना Yellow Alert जारी - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra Rain Update : आज राज्यात इथे मुसळधार पावसाचा इशारा ; या जिल्ह्यांना Yellow Alert जारी

Maharashtra Rain Update : राज्यात सध्या पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरुच आहे.

Maharashtra Rain Update : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पण काही भागांमध्ये मात्र पावसाचा (Maharashtra Rainfall) जोर कायम आहे. मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा (Mumbai-Kokan Rain) जोर जरी कमी झाला असला तरी सुद्धा हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतच आहे.

अशामध्ये आता पुन्हा हवामान खात्याकडून (IMD Alert) राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरुच आहे. या परिसरात ढगाळ वातावरण आहे. तर गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमधील नदी, नाल्यांना पूर आला होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहेत. अशामध्ये फळबाग शेतकरी देखील चिंतेत आले आहेत.

हे पण वाचा –

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक23 सप्टेंबर 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj