Maharashtra Rain Update : मराठवाड्यासह राज्यात "इथे" विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra Rain Update : मराठवाड्यासह राज्यात “इथे” विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Weather Update Maharashtra | राज्यात पोषक हवामान झाल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. २७) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत होता.

पुणे : राज्यात पोषक हवामान (Favorable Weather Condition) झाल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस (Rainfall) पडत आहे. मंगळवारी (ता. २७) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह (Cloudy weather) तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत होता. आज (ता. २८) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast with Lightning) हवामान विभागाने (weather Department) वर्तविली आहे.

मध्य पाकिस्तान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आज (ता. २८) उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सून परतीसाठी पोषक स्थिती

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वायव्य भारतातून २० सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला सुरुवात करत राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून काढता पाय घेतला. त्यानंतर परतीच्या प्रवासात कोणतीही वाटचाल झालेली नसून, मंगळवारी (ता. २७) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. परतीसाठी पोषक हवामान झाल्याने गुरुवारपर्यंत (ता. २९) वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   Monsoon Update: देशात मान्सून परतीचा प्रवास रखडला; 8 दिवसांपासून जैसे थे स्थिती

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली.

राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी

राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पाऊस पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. जालना जिल्ह्यातील पातूर, पालघर जिल्ह्यातील मोखेडा येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj