× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra Rains: महाराष्ट्रात “इथे” पुन्हा मुसळधार पाऊस, हवामान विभागाने दिला इतक्या दिवसाचा अलर्ट

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Maharashtra Rains heavy-raining-in-vidarbha-and-special-guidelines-given-by-imd

Maharashtra Rains: आज राज्यातील नागरिकांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) मोठा उत्साह बघायला मिळत आहे. सकाळ पासूनच शहरात, गाव खेड्यात शासकीय खासगी जागी देखील ध्वजारोहणाचा (Flag Hosting) उत्साह बघायला मिळत आहे. पण राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. प्रामुख्याने विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यात धोधो पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याचं चित्र आहे.

हवामान विभागाकडून गोंदिया (Gondia) जिल्ह्यांला रेड अलर्ट (Red alert) तर वर्धा (Wardha) आणि भंडारा (Bhandara) या जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: भंडारा आणि गोंदियात जोरदार पाऊस पडत आहे तरी सुरक्षिततेच्या पार्श्वभुमिवर प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईसह (Mumbai) उपनगरात सकाळ पासून तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबई (South Mumbai), पश्चिम मुंबई (West Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) या भागात पावसाच्या तुरळक सरी बघायला मिळत आहे. तसेच पुणे (Pune) जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. येदोन दिवस पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri Chinchwad) जोरदार पावसानं लावली आहे.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

(हे ही वाचा:- आज राज्यात या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज)

विदर्भातील (Vidarbha) विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटींग बघायला मिळत आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्यानं विळखा घातला असुन अप्पर वर्धा (Upper Wardha)- लोअर वर्धा (Lower Wardha) या सारख्या मोठ्या धरणांचे  दरवाजे उघडण्यात आले आहे. विदर्भातील भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. शहरी भागात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक15 ऑगस्ट 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon