Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra Weather Forecast :राज्यात ‘इथे’ अतिवृष्टीचा इशारा तर ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, पहा आजचा हवामान अंदाज

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
kokan vidarbha Havaman Andaj

Maharashtra Monsoon Update : परतीच्या प्रवासाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Monsoon Update : गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra Weather Forecast) हवामान झपाट्याने बदललं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Monsoon Update

याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं आता कोकण, मुंबई आणि गोव्यातील नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं हवामानाचा अंदाज घेवूनच नागरिकांनी बाहेर पडावं, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. मुंबईसह कोल्हापुरातही जोरदार पावसाची शक्यता असून दोन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

Maharashtra Weather Forecast

शनिवारी अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता रात्री पणजीपासून ११० किलोमीटर तर रत्नागिरीपासून १३० किलोमीटर अंतरावर होते. रविवारी दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत हा पट्टा मुंबई, कोकण, आणि गोव्यात दाखल होणार आहे.

IMD Rain Alert Today in Maharashtra

त्यामुळं किनारी भागांमध्ये पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. येत्या चार ऑक्टोंबर पासून महाराष्ट्रातून मान्सून (Monsoon Update) माघारी परतणार आहे. परंतु आता त्यापूर्वीच कोकणासह गोव्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.

Imd rain alert today in maharashtra pdf

कोकणातील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून काही ठिकाणी भूस्खलन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं हवामान खात्याने दक्षिण कोकणासह गोवाच्या किनारी भागांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, अंदमान, निकोबार, ओडिशा, गोवा, केरळ आणि कर्नाटकातील किनारी भागांमध्ये येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Latest Weather Update Maharashtra –

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon