हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra Weather Update : “इथे” उष्णतेची लाट तर विदर्भ मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम! असे असेल आजचे हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात कोकणात तापमान वाढलेले आहे. तर आजही विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचा चा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सोबत वादळी वारे वाहणार असल्याने घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाऊस अजुन किती दिवस आहे

Maharashtra Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. आज राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणात आणि मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे पण वाचा -   पंजाब डख नवीन हवामान अंदाज – दि.17 ते 25 जानेवारी पर्यंत राज्यात कसे राहील वातावरण? जाणून घ्या । Weather Forecast Maharashtra

K S Hosalikar Twitter (X)

तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

महाराष्ट्रात पाऊस किती दिवस आहे

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रीय स्थिती म्हणजे सायकल आणि सर्कुलेशन हे मराठवाडा व लगतच्या विदर्भावर आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही छत्तीसगड ते दक्षिण केरळपर्यंत आहे. ही द्रोणीका रेषा मराठवाडा व लगतच्या विदर्भावर असलेल्या चक्रीय स्थिती मधून जात आहे. त्यामुळे आज संपूर्ण राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   🔴4 सप्टेंबर 🌧पंजाब डख लाईव्ह | Panjabrao dakh live | हवामान अंदाज | Hawaman andaj today | Weather Update

कोकणात उष्णतेची लाट

पुढील दोन दिवस कोकण वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील पाच दिवस वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये २५ एप्रिलला वातावरण उष्ण व दमट राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक24 एप्रिल 2024
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2024

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

हे पण वाचा -   पंजाब डख हवामान अंदाज : पेरणी कधी करावी? पहा पंजाबरावांचा १० दिवसांचा अंदाज monsoon 2023 | पावसाचा अंदाज
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj