हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra Weather Update: थंडी सोबत अवकाळी पाऊस हजेरी लावणार का? पहा पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज

Maharashtra Weather update: हवामान उद्या पाऊस वेळ टेबल | पश्चिम विदर्भापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत असलेली द्रोणिका रेषा आज पूर्व विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे आर्द्रता घेऊन राज्यात येत आहेत. यामुळे राज्यात थंडी वाढणार असून काही भागात हलक्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather Update : ‘या’ भागात पावसाची हजेरी, पुढील आठवड्यात हवामान कसं राहील?

पुढील ४८ तासात विदर्भातील काही जिल्ह्यात हा अवकळी पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी कायम आहे. पुण्यात बुधवारी १० डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पुण्यासह मुंबई, सातारा, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात थंडी कायम आहे.

हे पण वाचा -   Mausam Update : आज या भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार, हवामान विभागाचा महत्वाचा अंदाज

हवामान पूर्वानुमान

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल पश्चिम विदर्भापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत असलेली द्रोणिका रेषा आज पूर्व विदर्भापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे आर्द्रता घेऊन राज्यात येत आहेत. उत्तर भारतावर तीव्र स्वरूपाचे जेट स्ट्रीम आहे आणि एक पश्चिमी विक्षोभ पाकिस्तान वरून उत्तर पश्चिम भारतावर येत आहे. यामुळे पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशत: ढगाळ राहील.

हवामान अंदाज महाराष्ट्र

विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, पुढील ४८ तासात किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आकाश वेळोवेळी अंशत: ढगाळ असल्यामुळे कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पाच फेब्रुवारीनंतर आकाश निरभ्र राहील. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे पुढील चार ते पाच दिवस किमान तापमानात जास्त घट होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   Maharashtra Rain | परतीचा पाऊस महाराष्ट्र व गुजरातला धुवून काढणार! भारतीय हवामान शास्त्रज्ञाचा इशारा

पुण्यात असे असेल हवामान

पुणे आणि परिसरात पुढील ७२ तास आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच हलके धुके पडण्याची शक्यता आहे. हवामानात मनात अंदाजे चार डिग्रीने घट होण्याचा अंदाज आहे. पाच, सहा व सात फेब्रुवारीला कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार पाच व सहा फेब्रुवारीला दिवसा थंडी जाणवेल.

आजचे हवामान पावसाचे

देशात उत्तरेत थंडीचा कडाका कायम आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरात हा पाऊस होणार आहे. तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर येथे काही भागात हीमवृष्टि होणार असल्याचा अंदाज आहे.

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj