हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Monsoon Update: यंदा मान्सूनची जोरदार बॅटिंग, धो-धो बरसणार, पण जूनमध्ये…; IMD चा हवामान अंदाज

Monsoon 2023 Forecast : देशात आता लवकरत मान्सूनच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. अशात यंदाच्या मान्सूनसंबंधी भारतीय हवामान खात्याकडून महत्त्वाचे अपडेट्स जारी करण्यात आले आहेत. यंदा मान्सून चांगला होणार असला तरी एका महिन्यात मात्र मान्सून पाठ फिरवेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याकडून शुक्रवारी मान्सून २०२३ संदर्भात महत्त्वाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाचा मान्सून हा सामान्य राहील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर यावेळी जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये ९६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. या दरम्यान, देशात ८७ सेमी पाऊस पडतो. तर ९६ ते १०४ टक्के झालेला मान्सून हा सामान्य मानला जातो. खंरतर, यंदा देशावर एल निनोचं संकट असणार आहे. पण हा धोका असला तरी नैऋत्य मान्सून भारतात सामान्य राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा -   🌀🌪️ पंजाब डख लाईव्ह। havaman andaj today live। weather report maharashtra। हवामान विशेष | Weather Update

हवामान खात्यानुसार, एल निनोमध्ये विषुववृत्तीय प्रशांत महासागराचा पृष्ठभाग गरम होतो आणि त्यामुळे मान्सून कमकुवत होतो. यावेळी ९० टक्क्यांहून अधिक एल निनोचा धोका जाणवणार आहे. यामुळे याचा मोठा परिणाम पावसावर आणि प्रामुख्याने शेतीवर पाहायला मिळेल.

Monsoon Updates: IMD ने मान्सूनबाबत दिली गुड न्यूज, एल निनोचा धोका असतानाही असा बरसणार पाऊस

भारतात जूनमध्ये कसा असेल पाऊस…

हवामान खात्याच्या पहिल्या अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागामध्ये जून महिन्यात मान्सून सामान्यपेक्षा कमी असेल. यामुळे जून महिन्यातही उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. वायव्य भारतातही सामान्यपेक्षा मान्सून कमी असेल. अशात दक्षिण द्वीपकल्पीय भारत, उत्तर भारत आणि ईशान्येकडील भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे या भागातील तापमानही सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा -   Monsoon 2023 Update : राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात इथे हलका, तर या भागात मुसळधार पाऊस आज इथे यलो अलर्ट

खरंतर, केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख १ जून आहे. गेल्या वर्षी हाच मान्सून २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. पण यावेळी मान्सून ४ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj