🌧️ पुढील 3 ते 4 दिवस ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
💁♀️ आज राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 दिवस विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
😱 विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज :
🌧️ हवामान विभागाच्या माहितीनुसार, 10, 11 आणि 12 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे.
👉 याशिवाय सोमवारीही याच जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती त्यांच्या X अकाऊंटवरून दिली आहे.
हे पण वाचा
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://havamanandaj.in/join