Skymate Weather Update | स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज आला ! ‘या’ 11 राज्यात बरसणार मुसळधार पाऊस - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Skymate Weather Update | स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज आला ! ‘या’ 11 राज्यात मुसळधार पाऊस

Skymet Havaman Andaj 2023 : देशातील अनेक राज्यांमध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील गुलाबी थंडीने दार ठोठावले आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

अनुक्रमणिका

Skymet Havaman Andaj

राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. तर काही भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार आहे.

मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात आता थंडीचा जोर वाढू लागला आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात थोडी-थोडी घट होऊ लागली आहे. परंतु अजूनही थंडीचा जोर म्हणावा तसा वाढलेला नाही.

हे पण वाचा -   Maharashtra Rain Updates: पंजाब डख यांचा २८ ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज..! राज्यात "इतके" दिवस उघडीप, तर "या तारखेपासून" पुन्हा मुसळधार

Maharashtra Havaman Andaj

पण आता गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत हलकीशी थंडी जाणवत आहे. त्याचवेळी, राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तसेच देशातील काही राज्यांमध्ये पावसाची स्थिती अजूनही कायमच आहे. राजस्थानच्या चुरू आणि हरियाणाच्या हिस्सारमध्ये किमान तापमान 10 अंशांच्या खाली पोहोचले आहे.

काही भागात पारा 10 च्या खाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात सहित काही राज्यांमधील नागरिकांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. एकंदरीत सध्या देशात समिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.

Panjabrao Dakh Havaman Andaj

अशातच स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. Skymet ने सांगितल्याप्रमाणे, पुढील २४ तासांत देशातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा -   पंजाब डख हवामान अंदाज: राज्यात पुढील तीन दिवस या भागात पाऊस [Panjab Dakh Weather Report]

याशिवाय, अंदमान आणि निकोबार बेटांवरही हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Skymet सोबतच IMD ने देखील देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने केरळ, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि आसाममध्येही हलका पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. 

हे पण वाचा –

हे पण वाचा -   मान्सून २०२२ । ११ जुलै संपूर्ण भारतासाठी मान्सूनचा हवामान अंदाज । Monsoon Updates Maharashtra
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj