Weather Alert Maharashtra : राज्यात पुणे वगळता 'या' जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Weather Alert Maharashtra : राज्यात पुणे वगळता ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Weather Today: राज्यभर पावसाने विश्रांती घेतली असतील तरी अनेक जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तुमच्या जिल्ह्यात काय आहे पावसाचा अंदाज? वाचा वेदर रिपोर्ट…

लाईव्ह हवामान अंदाज

राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक भागांमध्ये अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे परिसरात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला असला तरी राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला आहे. पण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान उद्या पाऊस

खरंतर, राज्यात परतीच्या मान्सूनसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. अशात आता हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भामध्ये येलो जारी केला आहे. महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आता पावसानं परतीची वाट धरली आहे. पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हे पण वाचा -   Unseasonal Rain Update : राज्यात दोन दिवस 'येलो अलर्ट', हवामान विभागाचा इशारा!

hawaman andaz

आज विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला वगळता इतर जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान अंदाज विदर्भ व महाराष्ट्र

हे पण वाचा -   🔴 पंजाब डख लाईव | पंजाबराव दख लाइव | हवामान चित्र | हवामन अंदाज आज लाइव | Weather Update
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj