हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather Forecast : राज्यात पुन्हा पावसाचं थैमान, या ८ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज

Monsoon Rain Forecast: पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार आणि जोराच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर जाणून घेऊयात आजचे हवामान पावसाचे कसे आहे?

मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यंदा मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतरही अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र मागील आठवड्याभरापासून मान्सूनने राज्यातील बहुतांश भाग व्यापून टाकला आहे.

हवामान अंदाज

अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुंबई आणि ठाण्यासह आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच कोकण किनारपट्टीवर पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा -   IMD Rain Alert : बापरे.. पुन्हा महाराष्ट्रासह ‘या’ 8 राज्यांमध्ये धो धो पावसाचा इशारा ! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस हजेरी लावणार आहे. यासोबतच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

पुण्यात कशी असेल स्थिती?

पुढील दोन दिवस पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून, घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार आणि जोराच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. ४ जुलैपर्यंत पाऊस सक्रिय राहणार आहे. शहरात बुधवारी रात्री साडेआठपर्यंत ८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दिवसभरात कमाल २८.१ आणि किमान २२.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पावसामुळे हवेत थोडा गारवा जाणवत होता. घाटमाथा आणि धरणक्षेत्रात जोराचा पाऊस पडला. दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा दिला आहे.

हे पण वाचा -   Weather Alert | विदर्भात आजपासून पुढील २ दिवस वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

राजधानी मुंबईला झोडपलं!

मुंबईला मंगळवारी दिलेल्या ऑरेंज अॅलर्टचा मुहूर्त चुकल्यानंतर बुधवारी मात्र सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. उत्तर मुंबई, ठाणे येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून पावसाचा वाढलेला जोर लक्षात घेतल्यानंतर प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई विभागासाठी बुधवारसाठी ऑरेंज अॅलर्ट पुन्हा जारी केला.

सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या नऊ तासांमध्ये कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर दहिसर येथील स्वयंचलित केंद्रांच्या नोंदीनुसार नऊ तासांमध्ये १५४.५ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. डहाणू येथे १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक30 जून 2023
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2023

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी खालील कोपऱ्यात येणाऱ्या बटनावर क्लिक करा.

हे पण वाचा -   Panjabrao Dakh Dakh | पंजाबराव डख लाईव्ह | हवामान अंदाज | havaman andaj today | Weather Update
Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj