‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, तुमच्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस?

देशातील गुजरातपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत आणि पूर्व राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याचं समजतंय.

याचा परिणाम कोकणासोबतच कोल्हापूर व सातारा या भागात अतिमुसळधार (रेड अलर्ट) पाऊस तर...

मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 6 ते 8 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस बरसणार (Rain Update) असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्यात 6 ते 9 जुलै या 4 दिवसांत कधीही मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मागील 3-4 दिवसांपासून कोकणात अतिमुसळधार पाऊस पडत आहे आणि तेथील नद्यांमुळे आसपासच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

गावागावांत पुराचे पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातही अतिवृष्टी झाली आहे, तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात त्या तुलनेत सध्या पाऊस कमी प्रमाणात बरसत आहे.