Monspoon Update Maharsahrtra: जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच (Monsoon) मान्सून आपले रुपडे बदलणार असल्याचा अंदाज आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही मान्सूनच्या शाखा सक्रीय होत असल्याने मंगळवारपासून (Marathwada) मराठवाड्यात तर मेघगर्जनेसह पावसाला सुरवात होणार आहे तर कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा (Meteorological Department) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे जे जूनमध्ये घडले नाही ते या महिन्यात होईल का असा प्रश्न आहे. आतापर्यंत सबंध राज्यात समप्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण आता या महिन्यात किमान सरासरीप्रमाणे पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार तर ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
कोकणावर वरुणाराजाची कृपादृष्टी
राज्यात पावसाचे आगमन झाल्यापासून कोकणावर कृपादृष्टी राहिलेली आहे. आगामी काळातही या कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पाळघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे. सुरवातीपासूनच या विभागात पावसाने हजेरी लावल्याने यंदा केवळ कोकणात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. उर्वरित महाराष्ट्राला पावसाची अपेक्षा कायम आहे.
मध्य महाराष्ट्रात काय राहणार स्थिती?
जून महिन्यात मध्य महाराष्ट्रात देखील मान्सूनने आपला लहरीपणा दाखवलेला आहे. पुणे वगळता इतर जिल्ह्यामध्ये पावसाची अवकृपाच राहिलेली आहे. मात्र, 5 जुलैपासून पुण्यासह सातारा, कोल्हापूरसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कुठे दिलासा तर कुठे चिंता ही कायम होती. पण आता पावसाचा जोर तर वाढणार आहेच शिवाय सर्वत्र हजेरीही लावली जाणार असल्याचा अंदाज आहे.
राज्यात पावसाचे आगमन झाल्यापासून कोकणावर कृपादृष्टी राहिलेली आहे. आगामी काळातही या कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पाळघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे.
हे पण वाचा
हे पण वाचा –
- Havaman Andaj Today | इथे चक्रीवादळाचे संकेत; ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज

- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा

- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी

- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त

- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी

- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!

- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…

- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav

- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?

| नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
|---|---|
| विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
| पत्ता | हवामान विभाग – IMD |
| दिनांक | 4 जुलै 2022 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद







