गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस (Rain) आजपासून राज्यातील विविध भागांत पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने (IMD) आज (दि.११ सप्टेंबर) रोजी काही जिल्ह्यांना हायअलर्टचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून अधून -मधून सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. यासोबतच कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर विदर्भातील भंडारा, नागपूर, यवतमाळ, वर्धा येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने पुढील दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील (Marathwada) जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता
हे पण वाचा
मुंबईमध्ये (Mumbai) सप्टेंबर सुरू झाल्यापासून श्रावणसरींचा अनुभव मुंबईकरांना येत आहे. सप्टेंबरमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज होता, मात्र मुंबईत अजून तरी पावसाचा जोर फारसा वाढलेला नाही. आज, बुधवारी पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनावेळी तसेच उद्या, गुरुवारी गौरी-गणपती विसर्जनावेळीही महामुंबई विभागात पावसाचा जोर मोठा असण्याची शक्यता नाही.