Panjabrao Dakh Havaman Andaj : नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे. राज्यात दिनांक 1 सप्टेंबर पासून पुढील पाच दिवस म्हणजेच दिनांक 5 सप्टेंबर पर्यंत विविध भागांमध्ये मुसळधार त्याचे मुसळधार पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे. तर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावेल आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे विश्रांती किंवा पावसाचा जोर कमी असेल याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Panjabrao Dakh Havaman Andaj : गेली काही दिवस विश्रांती वर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट अन काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हवामान खात्याप्रमाणेच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील आगामी काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात एक सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यावेळी मराठवाड्याकडून पावसाला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम मराठवाड्यातील नांदेड, परभणी मध्ये पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.
या काळात राज्यात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खानदेशात या कालावधीत जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे.
अनुक्रमणिका
Toggleहे पण वाचा
प्रत्येक विभागात पावसाचा दोन-दोन दिवसाचा मुक्काम राहणार असा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काही दिवस शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका यांसारखें विविध पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. अशा या महत्त्वाच्या अवस्थेत खरीप हंगामातील पिकांची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे, राज्यातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, जळगाव, धुळे, नंदुरबार, मुंबई, नाशिक, अहमदनगर, पुणे, हिंगोली, परभणी, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे. एकंदरीत महाराष्ट्रात सगळीकडे जोरदार पाऊस होणार अशी शक्यता आहे.
FAQs
- पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजांची अचूकता किती आहे?
पंजाबराव डख यांनी त्यांच्या अंदाजाच्या अचूकतेसाठी प्रसिद्धी मिळवली आहे. पूर्वीच्या अंदाजांमध्ये त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. - मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो?
मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. - पावसाच्या काळात कोणते आरोग्याच्या समस्या वाढू शकतात?
पावसाच्या काळात डेंग्यू, मलेरिया, आणि इतर जलजन्य आजारांचा धोका वाढतो. - राज्यातील कोणत्या भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते?
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. - शेतकऱ्यांनी पावसाच्या काळात कोणती काळजी घ्यावी?
पावसाच्या काळात पिकांची विशेष काळजी घेणे, शेतीचे नियोजन करणे, आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.