नमस्कार शेतकरी बंधूंनो हवामान अंदाज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पुढील तीन दिवसाचा म्हणजेच दि.31 मे आणि दिनांक 1 जून 2020 चा पावसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज.
शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये हवामानात बदल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दिनांक 30 तारखेला महाराष्ट्रातील एकंदरीत सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानात घट की आपल्याला बघायला मिळत आहे. कोकण किनारपट्टी लगतच्या काही भागात ढगाळ वातावरणाचा हलक्या सरी ठिकाणी येण्याचा अंदाज आहे.
दिनांक 31 तारखेला आपल्याला दुपारनंतर महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह सर्व किनारपट्टी लगतच्या भागात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी हे आपल्याला बघायला मिळतील.
शेतकरी मित्रांनो आता आपण मान्सून अपडेट 2020 पाहूयात
दिनांक 1 जून 2020 ला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात होईल आणि महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, अकलूज, अहमदनगर, लातूर, बीड, औरंगाबाद, मालेगाव, सोलापूर, चंद्रपूर, कापसी, पुणे, जळगाव या परिसरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळेल मात्र संपूर्ण महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण हे राहणार आहेत आणि मित्रांनो हा पूर्व मोसमी पाऊस असणार आहे.
शेतकरी बंधूंनो यापेक्षा अधिक विस्तृत हवामान अंदाजासाठी आणि आजचा हवामान अंदाज 2020 तसेच हवामान अंदाज विदर्भ आणि मराठवाडा या सह मध्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चैनल ला अवश्य भेट द्या.
Video
तिथे आपण दररोज शेतीविषयक आणि हवामान अंदाज आजचे व्हिडिओ अपलोड करत असतो त्याच बरोबर इथे या वेबसाइटवर त्या हवामान अंदाज आजचा सारांश तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद.
हे पण वाचा :
- Punjab Dakh यांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार Rain पडणार पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
- Maharashtra rain IMD Alert: 14 मार्चपासून ‘इतके’ दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता
- IMD Weather Alert : पावसाचे सावट कायम! येत्या २४ तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; अलर्ट जारी
- Panjab Dakh Havaman Andaj | पंजाबराव डख यांचा 10 मार्चपर्यंत या 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज