पंजाबराव डख यांचा ऑगस्ट महिन्याचा नवीन हवामान अंदाज ! राज्यात ‘या’ तारखेपर्यंत बरसणार मुसळधार पाऊस । Punjab Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार ते अति जोरदार पावसाची हजेरी लागली. काही भागात अक्षरशा अतिवृष्टी झाली अन तिथे पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. पुणे, कोल्हापूर मध्ये पूरस्थिती तयार झाली होती.

आता मात्र राज्यातील पावसाचा जोर थोडासा कमी झाला असून पूरस्थिती निवळली आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मोठा फटका बसलाय. पूरस्थिती तयार झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.

हा पावसाचा जोर पुढल्या महिन्यातही कायम राहणार आहे. 5 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. या काळात राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडणार आहे.

या कालावधीत दररोज भाग बदलत पाऊस पडणार असे पंजाब रावांनी सांगितले आहे. काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार, कुठे मुसळधार पाऊस पडणार, तर कुठे अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.

कोकण, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. पंजाब रावांच्या मते यावर्षी जायकवाडी आणि येलदरी यांसारखे अनेक प्रमुख धरणे शंभर टक्के भरणार आहेत. यामुळे यंदा पाण्याची कटकट राहणार नाही.

गेल्या वर्षी जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती यंदा राहणार नाही हे पंजाबरावांच्या अंदाजावरून स्पष्ट होत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

तसेच काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पूर्व विदर्भातील सहा तसेच पश्चिम विदर्भातील पाच अशा एकूण 14 जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

कोकणातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये 3 ऑगस्टपर्यंत अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. खानदेश वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्रात 31 जुलै पर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आणि एक ऑगस्टपासून या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top