मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. परंतु आता निवाळलेले हे वादळ दोन-तीन दिवसात पुन्हा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नव्याने निर्माण होणारे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होणार असून त्याचं नाव शाहीन असणार आहे. शाहीन हे नाव कतारकडून देण्यात आलेलं आहे. भारतावर याचा प्रभाव नसणार आहे आणि चक्रीवादळ ओमानच्या दिशेनं पुढे सरकणार आहे.
पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा
आज विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादेत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात आजसाठी चारही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा –
- IMD Alert Today हवामान खात्याचा इशारा…5 डिसेंबरपर्यंत या भागात होणार मुसळधार पाऊस
- Maharashtra Weather Update | हवामान विभागाची मोठी अपडेट, ‘या’ भागांना गारपीटीचा इशारा पहा १ डिसेंबर चा हवामान अंदाज
- Havaman Andaj | कुठे होणार गारपीट आणि वादळी पाऊस? असा आहे राज्यातील हवामान अंदाज २८, २९, ३० नोव्हेंबर
- India Meteorological Department : पुढील ३-४ दिवस होणार मेघगर्जनेसह पाऊस तर या २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Skymate Weather Update | स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज आला ! ‘या’ 11 राज्यात मुसळधार पाऊस
ह्या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापसाचं नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसू शकतो.