24 ते 27 ऑक्टोबर दरम्यान कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं | Panjab Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh News : सध्या अरबी समुद्रात तेज नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे केरळ, तामिळनाडूसहित देशातील इतरही काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेज चक्रीवादळामुळे केरळ आणि तमिळनाडू या दोन राज्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा या दोन्ही राज्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि येथे मुसळधार वादळी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

याशिवाय या वादळाचा परिणाम म्हणून जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि पुद्दुचेरीमध्येही पावसाची शक्यता तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे. यामुळे या संबंधित भागातील नागरिकांनी अधिक सतर्क आणि सावध राहणे आवश्यक आहे.

मात्र, भारतीय हवामान खात्याने या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे कालच स्पष्ट केले आहे. IMD ने म्हटले आहे की, या वादळामुळे महाराष्ट्रावरील किनारपट्टीवर आणि गुजरात वरील किनारपट्टीवर कोणताच विपरीत असा परिणाम होणार नाही.

गुजरात राज्यात तर पुढील सात दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील महाराष्ट्रात आगामी काही दिवस कस हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

डख यांनी 24 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबतचा महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 27 ऑक्टोबर पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.

विशेष म्हणजे राज्यातील काही भागात आता थंडीची तीव्रता वाढणार अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रात आता थंडीचा जोर वाढेल आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढत जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान 22 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान सोयाबीन तसेच इतर अन्य पिकांची हार्वेस्टिंग करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. कारण की, राज्यात 28 ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

28 ऑक्टोबर नंतर वातावरणात बदल होईल आणि नोव्हेंबर मध्ये राज्यात पुन्हा पाऊस पडू शकतो असा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात राज्यातील कोणत्या भागात पाऊस पडेल याबाबत अद्याप त्यांच्याकडून कोणतीच माहिती हाती आलेली नाही. 

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top