Weather Alert :राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस (Maharashtra Rains) आता पुन्हा जोरदार हजेरी लावणार आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी पाऊस दडी मारणार असल्याचं हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात आलं असलं तरी उद्यापासून म्हणजेच रविवारपासून राज्यात मुसळधार पावसाचा (Maharashtra Rains) इशारा देण्यात आला आहे. राज्यात रविवारी नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy rain) शक्यता आहे. तर इतर ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार आणि मंगळवारी काही ठराविक ठिकाणी पावसाचा जोर (Maharashtra Rains) वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 19 सप्टेंबर म्हणजे रविवारपासून पुढचे तीन दिवस हे राज्यात पावसाचे असणार आहेत. या दिवसांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत शेतीची कामे करावीत अशा सूचना दिल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून हवामानात काही अंशी बदल झाला असून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्टाचा उत्तर भाग, गुजरात (Gujarat) व राजस्थान (Rajasthan) या भागात ढगाळ वातावरण दिसत असल्याने हवामान विभागाने (Meteorological Department) पावसाची शक्यता वर्तवलीय. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सर्वसाधरण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून पालोदी अजमेर सह जमशेदपूर दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत पाऊस सक्रीय झाला आहे. तर अरबी समुद्रापासून गुजरात पूर्व राजस्थान या भागात कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
हे पण वाचा –
- Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
मध्य प्रदेश (Madhya Pradesh), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), महाराष्ट्र उत्तर भाग, गुजरात व राजस्थान या भागात पाऊस सक्रीय होण्याची चिन्ह असून म्यानमारच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली उद्या (19 सप्टेंबर) ओडिसा पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. दरम्यान 19 सप्टेंबर पासून पुढचे तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चांगली बातमी