Latest Weather Alert for Maharashtra: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. आता हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. हवामान विभागाने दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचा इशारा; ऐन थंडीत ‘या’ जिल्ह्यांना बसणार अवकाळी पावसाचा तडाखा
नवी दिल्ली : हवामन विभागाच्या ४ ते ५ दिवसांचा अंदाज जाहीर करत इशारा दिला आहे. उत्तर भारतात थंडीच्या लाट वाढणार आहे. उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात किमान तापमान २ ते ३ अंशांनी घसरेल. तर १२ ते १५ जानेवारी दरम्यान, पंजाब, उत्तर राजस्थान, हरयाणा आणि चंदीगडमधील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी म्हणजे १४ जानेवारीपर्यंत ओडिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी ओडिशा आणि तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. या आठवड्याच्या शेवटपर्यंत तामिळनाडू, कराईकल, पुद्दुचेरी, केरळ आणि माहे येथे गडगडाटी वादळाची शक्यता आहे.
देशाच्या उत्तर भागातून जाणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. असे आणखी दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स १६ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हिमालयाच्या पश्चिम भागात पुन्हा हलका पाऊस पडू शकतो.
वेस्टर्न डिस्ट्रबन्स म्हणजे काय?
वेस्टर्न डिस्टर्बन्स किंवा वेस्टर्न डिस्ट्रबेन्स विषुववृत्तीय क्षेत्रामध्ये येणारे उष्णकटिबंधीय वादळ. त्यामुळे हिवाळ्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या पश्चिम आणि उत्तर भागात अचानक पाऊस पडतो. जेव्हा जेव्हा वेस्टर्न डिस्टर्बन्स समुद्रावरून जातो तेव्हा वाऱ्यांमुळे चक्रीवादळ तयार होते. याला सायक्लोनिक परिसंचरण म्हणतात. या अभिसरणात हवा आणि आर्द्रता यांचे मिश्रण असते, ज्यामुळे पुढे पाऊस पडतो. हे वारे पश्चिमेकडून भारतात येतात म्हणून त्याला वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतात.
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात पाऊस आणि गरपिटीचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने दोन ते तीन दिवस नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील या ७ जिल्ह्यांना हवामान ( imd alert vidarbha ) विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. नागपूर, वर्धा, भंडाऱ्यात काही भागात मध्य स्वरुपाचा तर गडचिरोली, यवतमाळमध्ये जोरदार वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील काही जिल्हांमध्येही गारपिटीची शक्यता आहे. ११ ते १४ तारखेदरम्यान हा अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हे वाचलंत का?
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबराव डख यांचा २१ जून २०२५ पर्यंतचा हवामान अंदाज; ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस | Punjab Dakh Havaman Andaj
- आजचे हवामान | या २२ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
- महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला, अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट | Monsoon 2025
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025