× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र ते मराठवाडा, अवकाळी पावसाचा अंदाज, वीजाही चमकणार, वेगाने वारेही वाहणार

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Havaman Default
Summarise this post with:

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्ये तुरळक, तर काही ठिकाणी वादळी, वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील.

मुंबई, 22 एप्रिल : राज्यात तापमानाने प्रचंड उच्चांक गाठला आहे. मार्च महिन्यात तर अंगाची अक्षरश: लाही लाही व्हावी इतकं ऊन पडलं. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अक्षरश: 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये आजही उष्णतेची लाट आहे. तापमानाचा हा पारा मे महिन्यात आणखी किती चटके देणार हे येणाऱ्या काळात आपल्याला अनुभवायला मिळेलच. पण हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. पावसामुळे गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा गारवाचा विसावा मिळेल. पण या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्ये तुरळक, तर काही ठिकाणी वादळी, वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 21 एप्रिल आणि 22 एप्रिल या दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी काही ठिकाणी 23 एप्रिलला देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर 24 आणि 25 एप्रिल रोजी आकाश निरभ्र राहणार आहे. त्यावेळी कदाचित आपल्याला ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागतील. विशेष म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण आहे. याशिवाय थंड वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. ऊन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशाप्रकारचा गारवा मिळत असल्याने त्या परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. पण ग्रामीण भागांमध्ये अशा वातावरणाता नागरिकांना फटका बसू शकतो. कारण शेतीचं नुकसाण होऊ शकतं.

उत्तर कोकणात परिस्थिती काय असेल?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात 21 आणि 22 एप्रिल रोजी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्यतो पाऊस आणि वादळी वारे सुरु झाले तर घराबाहेर पडणं टाळा किंवा सुरक्षित स्थळी थोडावेळ आराम करा.

दक्षिण कोकणात परिस्थिती काय असेल?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही 21 आणि 22 एप्रिल रोजी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील. विशेष म्हणजे 23 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस पडणार नाही. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक किंवा विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यादिवशी देखील वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील. त्यानंतर हवामान मोकळं राहिली.

उत्तर मध्य महाराष्ट्रात वातावरण कसं असेल?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 एप्रिल रोजी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील.

दक्षिण मध्य महाराष्ट्रात वातावरण कसं असेल?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही 21 एप्रिल रोजी अवकाळी पावसाची शक्यता आहे. पण 22 एप्रिल रोजी कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांसह सांगली जिल्ह्यातही पावसाचं वातावरण असेल. तिथेही वारे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील. त्यानंतर 23 एप्रिल रोजी दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात काय परिस्थिती असेल?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातही आज, उद्या आणि परवा पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढचे तीनदिवस विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कदाचित ढगाळ वातावरण राहील आणि तुरळकही पाऊस पडू शकतो. या दोन जिल्ह्यांमध्येही वारे 30 ते 40 प्रतितास किमी वेगाने धावतील

Summarise this post with:
WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon