× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
havaman andaj today in march

Weather Update | हवामान अंदाज महाराष्ट्र 2023: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा चटका वाढत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे.

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये विजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या गुढीपाडव्यामध्ये व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता (Chance Of Rain At ‘This’ Place Today)

राज्यामध्ये या आठवड्यात पावसाची शक्यता (Weather Update) कायम आहे. मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी या ठिकाणी गुरुवारपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, लातूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी शुक्रवार आणि शनिवारसाठी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी नाशिक, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा यवतमाळ या ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अवकाळी पावसामुळे (Weather Update) शेतीतील गहू, हरभरा, मका, मूग इत्यादी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, राज्यातील वातावरणात (Weather Update) सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे, तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीतील पिकांना बसत आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.

महत्वाच्या बातम्या

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon