Monsoon 2023 Arrival in Kerala: केरळ किनार्यावरील ढगाळ वातावरणात वाढ या सर्व बाबींमुळं मान्सून आजचं दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार हे पाहावं लागणार आहे.
भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. मान्सूनचं आजचं केरळमध्ये आगमन झालं असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचं आगमन केरळमध्ये होतं, यंदा तब्बल ७ दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.
Koo App#Monsoon2023 Update 7 8 June 2023 ◆ मॉन्सूनने गुरुवारी केरळच्या बहुतांश भागासह लक्षद्वीप बेटे आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापला. ◆ पुढील ४८ तासांत मॉन्सून केरळचा उर्वरित भाग, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये प्रगती करू शकतो – आयएमडी – आम्ही कास्तकार (@AmhiKastkar) 8 June 2023
नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, ८ जून २०२३ रोजी प्रवेश केला आहे. मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरु आहे. केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, मन्नारचे आखातात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन १६ जूनला होईल असा अंदाज आहे.
सर्वांसाठी आनंद देणारी आणि दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागानं दिला आहे. आज सकाळपासून केरळमध्ये सर्वच भागात पाऊस सुरु झाला आहे. केरळमध्ये दरवर्षी १ जूनला मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा त्यासाठी सात दिवसांचा उशीर झाला आहे. यावर्षी मान्सून ८ जूनला दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजुनसार तळ कोकणात १६ जूनला मान्सून दाखल होऊ शकतो.
☔️नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, 8 जून 2023 रोजी प्रवेश केला आहे.
जून.
आयएमडी
☔️Southwest Monsoon has set in over Kerala today, the 8 June, 2023 against the normal date of 1 June.
IMD pic.twitter.com/ZJwRVdpAgE— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 8, 2023हे पण वाचा
Havaman Andaj Today | इथे चक्रीवादळाचे संकेत; ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
के. एस. होसाळीकर यांनी मान्सूनच्या आगमनाबाद्दल माहिती दिली आहे. यंदाचा मान्सून ८ जून रोजीचं दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. हवामान विभागानं यापूर्वी पुढील ४८ तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी माहिती दिली होती. मात्र, बदलेल्या वातावरणातील स्थितीमुळं मान्सून आजचं दाखल झाला आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात पोहोचण्यासा साधारणपणे ७ दिवसांचा वेळ लागतो. त्या अंदाजानुसार आज मान्सून केरळमध्ये आल्यानं महाराष्ट्रात मान्सून १६ जून रोजी दाखल होईल.
दरम्यान, गेल्या १२ वर्षांचा अभ्यास केला असता केवळ एका वर्षीचं मान्सून महाराष्ट्रात ७ जूनच्या दरम्यान दाखल झाला होता. मान्सूनचा गेल्या १२ वर्षातील प्रवास पाहिला असता महाराष्ट्रात मृग नक्षत्राला मान्सून दाखल होतो हे समीकरण बदललं असल्याचं दिसून येत. मान्सून आज दाखल झाल्यानं केंद्र सरकार समोरील देखील चिंता दूर झाली आहे.







