Weather Update : देशासह राज्यात मागील तीन दिवसांपासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यादरम्यान राज्यात येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात गणपती उत्सवादरम्यान पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचे आगमन झाले होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई, कोकण, ठाण्यासह नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. या पावसामुळे राज्यातील शेतकरी काही प्रणाणात सुखावला आहे.

दरम्यान हवामान तज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये २१ सप्टेंबरपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने, राज्यात अंतर्गत जिल्ह्यांमध्ये ह्या येत्या ४,५ दिवसांत पिवळ्या इशाऱ्याने दर्शविल्या गेलेल्या तुरळक ठिकाणी, गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान या अंदाजाप्रमाणे पाऊस झाल्यास राज्यातील पीकांना नवसंजीवनी मिळणार आहे.
हे ही वाचा
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
- Weather Update: महाराष्ट्रात पाऊस कधी व कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज!
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today