Punjab Dakh Havaman Andaj | महाराष्ट्रात ‘या’ तारखेनंतर पुन्हा धो-धो पाऊस बरसणार, पंजाबरावांचा हवामान अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे पावसासंदर्भात. जस की आपणांस ठाऊकच आहे की, यंदा मान्सून काळात महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 12 टक्के कमी पाऊस पडला आहे. ही आकडेवारी हवामान खात्यानेच सार्वजनिक केली आहे.

Panjabrao Dakh Havaman Andaj

यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका यांसारख्या विविध पिकांच्या उत्पादनात मोठी घट पाहायला मिळत आहे. शिवाय बाजारात नवीन हंगामातील शेतमालाला अपेक्षित असा दरही मिळत नाहीये. कांदा वगळता सर्वच शेतमालाचे बाजारभाव दबावात असल्याचे पाहायला मिळत आहेत.

यामुळे कमी पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. सध्या स्थितीला राज्यातील काही भागात रब्बी हंगामापूर्वीची कामे केली जात आहेत. जमिनीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे.

India Meteorological Department

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात आता थंडीचा जोर वाढणार आहे. यानुसार काही भागात गुलाबी थंडीची चाहूल देखील लागली आहे. राज्यातील जळगाव, नासिक, अहमदनगर, पुणे यांसारख्या शहरांमध्ये कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. दरम्यान, पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज आहे.

havaman andaj update

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात एक मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. 12 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत यंदा दिवाळीचा सण साजरा होईल. 12 नोव्हेंबरला दीपावली, नरक चतुर्दशी, लक्ष्मी कुबेर पूजन साजरा होणार आहे. 14 नोव्हेंबरला दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा आणि 15 तारखेला भाऊबीज साजरा होणार आहे.

दरम्यान दिवाळीच्या काळात मोठा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला आहे. म्हणजेच 12 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान एक मोठा पाऊस पडू शकतो. याशिवाय डिसेंबर महिन्यातही एक मोठा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो की नाही याकडे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे बारीक लक्ष राहणार आहे. 

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top