Maharashtra Weather Update : उत्तर ओडीशा ते पूर्व विदर्भावर सध्या चक्राकार वारे वाहत असून कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. जाणून घ्या सविस्तर..राज्यातील वातावरणात सतत बदल होताना दिसतोय. यावेळी अनेक भागात सध्या उन्हाचा कडाका जाणतोय. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 16 ते 19 मार्च या काळात चार दिवस विदर्भातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भाच्याच काही भागांमध्ये पावसाळी वातावरणाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लाईव्ह हवामान अंदाज
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे सत्र सुरुच असून आजपासून विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर ओडीशा ते पूर्व विदर्भावर सध्या चक्राकार वारे वाहत असून कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. त्यामुळे तुरळक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यावे ळी ३० ते ४० प्रतिकिमी वेगाने वारे वाहतील.
आज व उद्या गारपीटीची शक्यता
उद्या दि १७ व १८ दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता संभावते, असे हवामान विभागाने सविस्तर हवामान अंदाजात नोंदवले आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचे सांगण्यात आले.
तापमान सामान्य पेक्षा चढेच राहणार!
विदर्भात कमाल तापमान हे सामान्य तापमानापेक्षा ३ ते ४ अंशांनी चढे राहणार असून पुढील तीन ते चार दिवस तापमानात फारसा फरक जाणवणार नाही.
दरम्यान, आज दिनांक १६ मार्च रोजी विदर्भातील पाच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या व परवा (17,18 मार्च) रोजी पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे.

यलो अलर्ट कुठे?
- १७ मार्च- अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
- १८ मार्च- अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
- १९ मार्च- वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया
कोणत्या भागांना बसणार अवकाळी पावसाचा फटका?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर तसंच यवतमाळ जिल्ह्यांत 18 मार्चपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खान्देशातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याशिवाय उत्तर भारतात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घाबरुन न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. या ठिकाणी वातावरण कोरडेच राहणार आहे.
देशभरात कसं असणार आहे वातावरण?
दिल्लीमध्ये आजपासून उष्मा आणखी वाढण्याची शक्यता असून पारा 30 अंशांच्या पुढे जाईल, असं हवामान खात्याने सांगितलंय. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते. त्याचप्रमाणे किमान तापमानातही वाढ होणार असून 21 मार्चपर्यंत कमाल तापमान हळूहळू 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल.
शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे दररोज तुमच्या मोबाईलवर लाईव्ह हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच ही माहिती इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.