Monsoon Update Today : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुढील तीन ते चार दिवसात गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालमधील काही भाग, बिहारचा काही भाग आणि उत्तर प्रदेशातून पुढे जाईल. या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून (Monsoon) लवकर भारतात दाखल झाला. मात्र, महाराष्ट्रातील काही भागात पोहोचल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला होता. आता भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) जारी केलेल्या अंदाजानुसार ३ जूलैपर्यंत मान्सून देशात पुन्हा सुरु होईल.
उत्तर पश्चिम भारतात मान्सूनचा पाऊस जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा आहे. ११ जून नंतर भारतात मान्सूनचा वेग मंदावला होता. दोन दिवसांपूर्वी मान्सून मध्य भारताच्या पुढे पोहोचला होता.
पुढील तीन ते चार दिवसात ‘या’ ठिकाणी पाऊस पडणार? (Monsoon Update)

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुढील तीन ते चार दिवसात गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालमधील काही भाग, बिहारचा काही भाग आणि उत्तर प्रदेशातून पुढे जाईल. या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २७ जूननंतर उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये अलनिनो विकसित होण्याची अपेक्षा आहे. या अलनिनोमुळं भारतातील मान्सूनच्या पावसावर विपरीत परिणाम होत असतो. अलनिनो निर्माण झाल्यास भारतात मान्सूनचा पाऊस कमी प्रमाणात होतो.
अवश्य वाचा : राज्यात सलग दोन दिवस दमदार पावसाची शक्यता
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एम. राजीवन यांनी मान्सून पुन्हा सक्रीय होत असल्याचं म्हटलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून पोहोचेल. पुढच्या दोन ते तीन आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. अलनिनोच्या प्रभावामुळं ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा हवामान विभागाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मान्सून खोळंबला होता. जवळपास नऊ दिवस मान्सून नवसारी, जळगाव, मंडला, पेंड्रा रोड, झारसुगुडा, बालासोर, हल्दिया, पाकूर, साहिबगंज रक्सोल पर्यंत पोहोचला होता. पुढील तीन ते चार दिवसात अरबी समुद्राचा उत्तरेकडील भाग, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून पुढे प्रवास करेल.
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
- Weather Update: महाराष्ट्रात पाऊस कधी व कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज!
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today