Monsoon Update 2022 | राज्यभरात बुधवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान, पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीसंदर्भात माहिती जाणून घेतली. ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर तातडीने मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत.
बुधवारी मुंबई, ठाण्यालाही पावसाने जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टीमुळे या भागातील रस्ते वाहतूक मंदावली आणि कामावरुन घरी परणाऱ्यांचे मोठे हाल झाले. मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळच्या सुमारास जोर धरला. ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पातलीपाडा, खारेगाव आणि कोपरी या तीन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला.
अनुक्रमणिका
Toggleआजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 09 सप्टेंबर 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
Web Title: Heavy rainfall in maharashtra cm eknath shinde ordered to give help to victims rvs
हे पण वाचा
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद