Havaman Andaj Today | महाराष्ट्रात 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहील. तसेच, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचीदेखील चिंता वाढली असून राज्यातील रब्बी पीक अडचणीत आले आहे. विशेषत: रब्बी ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात 50 टक्क्यांहून अधिक ज्वारीच्या क्षेत्रावर या किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे यंदा ज्वारीचे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
पुढील 4 ते 5 दिवस थंडी
राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या किमान तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आजचा हवामान अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात थंडीची लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली होती. तसेच, किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु, दिवसाच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
थंडीसोबत धुक्याचे प्रमाणही वाढले
राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडी, पावसासोबत धुक्याचे प्रमाणही वाढत असल्याने रब्बी पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील 50 टक्क्यांहून अधिक क्षेत्रातील ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आहे.
रब्बीतही नुकसान होण्याची शक्यता
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, विहिर, तलावांत भरपूर पाणी असल्याने रब्बी हंगामात चांगले पीक येण्याची आशा बळीराजाला आहे. यातून खरीपाचे नुकसान भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, आता पुन्हा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुक्यांमुळे पिकांवर संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
इतर हवामान अंदाज –
- Punjab Dakh यांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार Rain पडणार पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
- Maharashtra rain IMD Alert: 14 मार्चपासून ‘इतके’ दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता
- IMD Weather Alert : पावसाचे सावट कायम! येत्या २४ तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; अलर्ट जारी
- Panjab Dakh Havaman Andaj | पंजाबराव डख यांचा 10 मार्चपर्यंत या 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज