पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही प्रमाणात वादळ निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमकडून उत्तरेकडे पुढे सरकत आहे. ही परिस्थिती पुढचे दोन दिवस कायम राहणार आहे. देशाच्या दक्षिणेकडील भागात ३१ जानेवारीपर्यंत दाब कायम राहणार असून याचाच परिणाम राज्यातील काही भागावर होणार आहे.
त्यामुळे २८, २९ जानेवारीला राज्यातील मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटांसह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पुन्हा एकदा उत्तर भारतात जाणवणार (IMD Weather) आहे. उत्तर भारतातील बहुतांश भागात पुढचे ४८ तास, किमान तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसने वाढणार असून, उष्णता निर्माण होणार आहे. पश्चिम हिमालयात पुढचे काही दिवस काही प्रमाणात हलका पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
तसेच, २९ ते ३० जानेवारी दरम्यान संपूर्ण पश्चिम हिमालयात जोरदार पाऊस किंवा बर्फवृष्टी तर वायव्य भारतील मैदानी प्रदेशात हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
दक्षिणेकडील तमिळनाडू, पदुच्चेरी, कारिकाल, केरळ आणि माहे या भागात बऱ्यापैकी विखुरलेले प्रमाणात पाऊस पडणार आहे. तसेच संपूर्ण द्वीपकल्पीय बेटांवर काही प्रमाणात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
हेही वाचा:
- Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- Maharashtra Rain Update : येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- IMD Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून अलर्ट जारी
- Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाच्या मुसळधारा? पहा आजचा नवीन हवामान अंदाज
- IMD Rain Alert : आज या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस, पहा आजचा हवामान अंदाज