भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार या वर्षी मान्सून (Mansoon 2022) वेळेत दाखल होणार असल्याचे सांगितले गेले. विशेष म्हणजे मान्सूनचा (Mansoon Update) प्रवास देखील या वर्षी चांगला दणक्यात सुरु झाला, मागील आठवड्यात मान्सून अंदमानात दाखल झाला अन इकडे बळीराजाच्या (Farmer) चेहऱ्यावर समाधानाचा भाव स्पष्ट झळकू लागला.
Monsoon 2022 Maharashtra
मात्र ही आनंदाची बातमी कानावर आली अन केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची चाहूल ऐकायला मिळाली. यामुळे तूर्तास जनतेस उष्णतेपासून आराम मिळाला मात्र याबरोबरच बळीराजाच्या काळजाची धडधड देखील वाढली. इथपर्यंत मान्सून राज्यात वेळेत दाखल होईल अशी अशा हवामानात तज्ञासमवेतच सर्वांना होती. आता मात्र मान्सूनबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे.
आजचे हवामान काय आहे
हाती आलेल्या माहितीनुसार मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला असून तो काही काळ तिथेच स्थिरावलेला बघायला मिळतं आहे. मान्सूनमध्ये अडथळा निर्माण झाला असल्याने अरबी समुद्रात मान्सून दोन दिवस अधिक मुक्काम ठोकणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे तळकोकणात वेळेत दाखल होऊ पाहणारा मान्सून दोन दिवस उशिरा दाखल होणार असल्याचे मत हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र 2022
आगामी दोन दिवसात मान्सून हा केरळ मध्ये धडकणार असून त्यानंतर त्याचा प्रवास तळकोकणाकडे सुरु होणार आहे. 5 जूनच्या सुमारास मान्सून तळकोकणात बघायला मिळेल आणि मग 7 जुनच्या सुमारास तो राजधानी मुंबईत दाखल होणार आहे. म्हणजेचं मान्सून हा दोन दिवस उशिरा कोकणात दाखल होणार आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतीय हवामान विभागाने या वर्षी पाच जूनला मान्सून मुंबईमध्ये धडकणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले होते. मात्र आता मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्याने मान्सूनचा पहिला पाऊस हा दोन दिवस लांबणीवर पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
लाईव्ह हवामान अंदाज
सध्या मान्सून लवकर येण्यासाठी वातावरण पूरक नसल्याचे तज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी, 10 जून पासून ते 16 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनानंतर मोठा जोराचा पाऊस होणार असल्याचे देखील सांगितले जातं आहे.
पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज
एकंदरीत काय ज्या मान्सूनची मोठ्या आतुरतेने वाट बघितली जात होती त्याचा प्रवास आता दोन दिवस अधिक अरबी समुद्रात राहणार असून मुंबईत यावेळी मान्सून दोन दिवस उशिरा दाखल होणार आहे. असे असले तरी मान्सून हा लवकरच मुंबई गाठणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आता खरीप हंगामासाठी तयारीला लागणे महत्त्वाचे राहणार आहे.
- Punjab Dakh यांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार Rain पडणार पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
- Maharashtra rain IMD Alert: 14 मार्चपासून ‘इतके’ दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता
- IMD Weather Alert : पावसाचे सावट कायम! येत्या २४ तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; अलर्ट जारी
- Panjab Dakh Havaman Andaj | पंजाबराव डख यांचा 10 मार्चपर्यंत या 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज
- Panjabrao Dakh Weather Report | ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज