हवामान अंदाज: राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending

हवामान अंदाज: राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

हवामान अंदाज महाराष्ट्र 2021 – राज्यात पुढच्या आठवड्याभरात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढचे 4-5 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सोमवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला.

अनुक्रमणिका

आजचे हवामान

राज्यातही थंडीची चाहूल कमी होत असून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली.

लाईव्ह हवामान अंदाज

सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरीत ३५.७ अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमान महाबळेश्वर येथे १८.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. राज्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. जवळपास सर्वच विभागात थंडी कमी झाली आहे.

सध्या अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र त्याचबरोबर राज्यात प्रवेश करणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे १९ नोव्हेंबरपर्यंत दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

पुण्यात सोमवारी अंशतः ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात लक्षणीय वाढ होत किमान तापमान २०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यामुळे सोमवारी दिवसभर उकाडा जाणवत होता. गेल्या तीन दिवसांपासून शहरात थंडी कमी होत असून उकाड्यात वाढ होत आहे. दरम्यान पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने हे चित्र असेच कायम राहणार आहे.

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक16 नोव्हेंबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी व पंजाब डख हवामान अंदाज whatsapp group साठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Web Title: Heavy rain with thunderstorms in the state on this date; Meteorological Department warns 11 districts including Pune

शेअर नक्की करा: