India Meteorological Department : पुढील ३-४ दिवस होणार मेघगर्जनेसह पाऊस तर या २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain Update : राज्यात पुढील ३-४ दिवस मेघगर्जनेसह पाऊस; २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट. राज्यात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवण्याची शक्याता आहे. राज्यात येत्या तीन-चार दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच शनिवारी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवमान विभागाने व्यक्त केली आहे. या २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

कुठे होणार पाऊस?

राज्यात २५, २६, २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता असून ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

य़ासोबतच विदर्भात बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पावसाच्या आगमनाने येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top