Maharashtra Monsoon Update : परतीच्या प्रवासाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Monsoon Update : गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra Weather Forecast) हवामान झपाट्याने बदललं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Monsoon Update
याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं आता कोकण, मुंबई आणि गोव्यातील नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं हवामानाचा अंदाज घेवूनच नागरिकांनी बाहेर पडावं, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. मुंबईसह कोल्हापुरातही जोरदार पावसाची शक्यता असून दोन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather Forecast
शनिवारी अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता रात्री पणजीपासून ११० किलोमीटर तर रत्नागिरीपासून १३० किलोमीटर अंतरावर होते. रविवारी दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत हा पट्टा मुंबई, कोकण, आणि गोव्यात दाखल होणार आहे.
IMD Rain Alert Today in Maharashtra
त्यामुळं किनारी भागांमध्ये पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. येत्या चार ऑक्टोंबर पासून महाराष्ट्रातून मान्सून (Monsoon Update) माघारी परतणार आहे. परंतु आता त्यापूर्वीच कोकणासह गोव्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.
Imd rain alert today in maharashtra pdf
कोकणातील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून काही ठिकाणी भूस्खलन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं हवामान खात्याने दक्षिण कोकणासह गोवाच्या किनारी भागांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, अंदमान, निकोबार, ओडिशा, गोवा, केरळ आणि कर्नाटकातील किनारी भागांमध्ये येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
Latest Weather Update Maharashtra –
- Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
- Monsoon Breaking News: राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, पाहा आजपासून पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज