Maharashtra IMD Weather Update | महाराष्ट्रात आज काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या आहेत. तर अनेक भागात ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणातील गारठा कमी झाला. हवामान विभागाने काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली.
हवामान विभागाने आज जळगाव आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकते, असाही अंदाज दिला.
उद्याही या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर नगर जिल्ह्यात रविवार आणि सोमवारीही काही भागात हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलक्या पाऊस पडेल.
तर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस हलक्या सरी पडतील. धुळे जिल्ह्यात शनिवार आणि सोमवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. नाशिक जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवार तर पुण जिल्ह्यात शनिवार आणि रविवार कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
हे पण वाचा
सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही भागात आज आणि उद्या तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. जालना, धाराशीव, अमरावती, बीड जिल्ह्यात आज तर बुलडाणा, अकोला जिल्ह्यात आज आणि उद्या काही भागात हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.