Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार व अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, पुढील २४ तासांत कुठे होणार पाऊस? - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार व अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, पुढील २४ तासांत कुठे होणार पाऊस?

Maharashtra Weather Update : अवकाळी पावसाने महाराष्ट्रात पिकांचे मोठे नुकसान. दरम्यान आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होईल आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने (Department of Meteorology) वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहिल.

राज्यात 10 जानेवारी 2024 रोजी सकाळपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यात पावसाच्या हलक्या सरी (Maharashtra Weather Update)

पुणे, नाशिक, नगर, धुळे-नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. पुण्यात दुपारपासून पावसाची रिमझिम सुरु झाली तर रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळपासून पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली तर रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाला.

हे पण वाचा -   11 ते 17 जुलै हवामान अंदाज : रामचंद्र साबळे यांचा ७ दिवसांचा hawaman andaz

अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, भात, ज्वारी, बटाटा, मका, भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे जाहीर केले आहे.

येत्या 24 तासांत राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य-उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढणार (Maharashtra Weather Update)

दरम्यान आजपासून (दि.11) पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होणार असून कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

हे पण वाचा -   Maharashtra Weather Update: थंडी सोबत अवकाळी पाऊस हजेरी लावणार का? पहा पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 12 जानेवारी पर्यंत राज्यात पावसाळी वातावरण राहणार आहे.

Mumbai : पश्चिमेने येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या (Rain Update) हलक्या सरी सुरु होत्या. दरम्यान आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होईल आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने (Department of Meteorology) वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहिल. (Maharashtra Weather Update) त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील बहुतांश भागात बुधवारी (दि. 10) पावसाने हजेरी लावली. कोकणात आणि खासकरुन रत्नागिरीमध्ये 0.5 मीमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि नगरमध्ये 7.8 मीमी पावसाची नोंद झाली. नाशिक आणि पुण्यात 1.6 मीमी पाऊस झाला. या शिवाय मराठवाड्यात आणि औरंगाबादमध्ये 0.5 मीमी पावसाने हजेरी लावली. विदर्भ, अकोल्यात 0.2 तर नागुपरात 0.3 मीमी पावसाची नोंद झाली.

हे पण वाचा -   पंजाब डख लाईव्ह | Panjabrao dakh Live | हवामान अंदाज | Hawaman andaj Live today | Weather Update

हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, अरबी समुद्रात तयार झालेली हवेची द्रोणीय रेषा, आग्नेय दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात पावसाने हजेरी लावली. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. बुधवारी पावसाचा जोर कमी होत असल्याचे दिसून आले.

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj