हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

यंदा देशात 102% पाऊस होणार व सर्वसामान्य राहील मान्सून

हवामान अंदाज.इन : देशभरात यंदा सर्वसाधारण मॉन्सून आणि सरासरी १०२ टक्के पाऊसमान असणार, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. यात १ ते ४ कमी-अधिक प्रमाणे असू शकेल. महाराष्ट्र राज्यासह मध्य भारतात एकंदरीत १०३ टक्के पावसाचा अंदाज आहे. 

भारतीय हवामान विभागाने ०१ तारखेला दुसरा दीर्घकालीन हवामान अंदाज जाहीर केला. यावेळी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा हे उपस्थित होते. १५ एप्रिल रोजी हवामान विभागाने आपला पहिला अंदाज जाहीर केला होता. 

हवामान विभागाने जाहीर केलेले प्रमुख अंदाज याप्रमाणे…

  • वायव्य विभाग – १०७ टक्के, मध्य विभाग – १०३ टक्के, दक्षिण विभाग – १०२ टक्के, ईशान्य विभाग – ९६ टक्के (कमी-अधिक ८ टक्के)
  • यंदा ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान ला-लिना हलक्या स्वरूपातील स्थिती निर्माण होणार असल्याने याकाळात पाऊस वाढेल.
  • जुलै महिन्यात १०३ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाची शक्यता (कमी-अधिक ९ टक्के)
हे पण वाचा -   पुढील दोन दिवस पुण्यात पाऊस, हवामान खात्याची माहिती; अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

तर अश्यायाप्रकारे वातावरण असेल. तुमचे प्रश्न कमेंट करा. धन्यवाद.

1.यंदा पाऊस कसा राहील?

देशभरात यंदा सर्वसाधारण मॉन्सून आणि सरासरी १०२ टक्के पाऊसमान असणार, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

2.महाराष्ट्रात मान्सून कधी येणार?

दि.०८ जून २०२० ला मान्सून महाराष्ट्रात येईल अशी घोषणा भारतीय हवामान विभागाने दिली आहे

.3.निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात कुठे धडकणार?

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर,बदलापूर आणि अंबरनाथ या क्षेत्रांचा या पट्ट्यात समावेश आहे

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj