Punjab Dakh Havaman Andaj | भरमसाठ पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करुन शेतकऱ्यांना पेरणीला प्रोत्साहन करणारे कथित हवामानतज्ञ पंजाबराव डख पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानंतर आता दुष्काळ पडणार आहे असं सांगत डखांनी नवा व्हिडीओ रिलीज केल्यानं शेतकरी मात्र संतापले आहेत.
परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. यामध्ये डख काही कंपन्यांकडून भरमसाठ पैसे घेतात असा आरोप आहे.
पंजाब डख हवामान अंदाज
गेली काही वर्षे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आपल्या हवामान अंदाज साठी पंजाबराव डख हे व्यक्तिमत्व विशेष लोकप्रिय आहे. डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचं मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यात डख यांच्या नावाचं वादळ गेल्या काही वर्षात पाहावयास मिळत आहे.
राज्यात कदाचित असा एखादाच शेतकरी असेल ज्याला पंजाबराव हे नाव माहिती नाही. एक वर्ष हवामान अंदाज अचूक ठरल्यानंतर सातत्यानं चुकीचे हवामान अंदाज येत असल्यानं यांच्या हवामान अंदाजावर दबक्या आवाजात शेतकऱ्यांमधे चर्चा आहे. एप्रिलच्या सुरवातीपासून पंजाबराव डख यांनी राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं भाकीत व्यक्त केलं होतं.
आजचे हवामान पावसाचे
पंजाबराव डखांच्या या पलटीवर शेतकरी उमेश गायकर म्हणाले, एक गाजलेले हवामान अभ्यासक…त्यांचे अक्षरशः हजारेक WhatsApp ग्रुप,बरेच युट्यूब चॅनेल एवढा पसारा. आणि ब्रेकिंग न्युज प्रमाणे रोजच पावसाचे अंदाज. 365 दिवसात 365 अंदाज. साहजिकच काही गोळ्या लागायच्या काही हुकायच्या.
पण हुकलेल्याचा डेटा कोण ठेवतो, लागलेल्याचा ‘डंखा’ त्रिखंडात. आणि भाषा… धुवुन काढणार, आजवर बघितलं नसेल असा पाणी पडणार, वाहून जाणार, भयानक पाऊस… द्राक्षं उतरायला आलेली असतात तेव्हा हलकासा हवामान बदल देखील शेतकऱ्याचा बीपी वाढवतो.
त्यात असल्या भाषेत अंदाज ऐकून अनेकजण सलाईन वर गेले असतील. तीन वर्षात मार्केटला या अभ्यासकाने अक्षरशः झोपवले. अनेक शेतकऱ्यांनी विनंत्या केल्या, आर्जव केली.. तुम्ही क्लिपा ऐकल्या असतीलच, पण साहेब आपल्याच धुंदीत.
panjabrao dakh weather today
योगायोगाने तीन वर्षात पावसाने थैमान मांडल्याने यांचे अंदाज बरोबर ढगात लागत. आता मात्र त्यांचा कस लागलाय…कधी नव्हे तो!! आमचं लक्ष आहे. पावसाने दडी मारल्यावर किती अंदाज बरोबर येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शेतकरी संदीप कोकाटे म्हणाले, अंदाज चुकला म्हणतो हा बाबा , म्हणजे हवामान खते मार्च -एप्रिल पासून सांगत होत की दुष्काळ आहे आणि हा भाऊ खूप पाऊस पडेल म्हणत आणि अत्ता अंदाज चुकला म्हणतो.
पंजाबराव डखांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी जोरदार पेरणीची तयारी केली होती. भारतीय हवामान विभाग (IMD)कडून वारंवार यंदा अलनिनो वर्ष असल्यानं सरासरी इतका पाऊस पडेल असं सांगण्यात आलं होतं.
सोशल मिडीयात अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे हवामान अंदाज व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांची फसवणुक होते, याविषयी MaxKisan ने भारतीय हवामान विभागाचे (IMD)चे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याशी संवाद साधला होता.
हे पण वाचा
india meteorological department
हवामान अंदाज ही शास्त्रीय पध्दत असते, सर्वच हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवर मांडले जातात. शेतकरी आता जागरुक होत असल्याने भविष्यात बोगस हवामान अंदाजकांची दुकानं बंद होतील असं ते म्हणाले.
हवामान अंदाजातील या बोगसगिरीबद्दल MaxKisan ने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयाचे निवृत्त अधिष्ठाता आणि हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी चर्चा केली. डॉ. साबळे म्हणाले, मी काही वर्षापुर्वी एका शेतकरी कार्यक्रमासाठी परभणी या ठिकाणी गेलो होतो.
havaman andaj today
एक शेतकऱ्यांचा गट एका व्यक्तीला माझ्याकडे घेऊन आला. म्हणाले, सर हे हवामान अंदाज व्यक्त करतात. त्यांना तुमचा फक्त आर्शिवाद द्या. मी त्यांना सांगितले, हवामान अंदाज व्यक्त करण हा येगागबाड्याळाचा खेळ नाही. आकडेवारी, शास्त्रीय माहीती सोबत तुम्हाला विश्लेषण करण्यासाठी अभ्यास लागतो.
तुम्ही हे करु नका असं मी त्यांना सांगितलं.परंतू पुढील काही वर्षात हेच गृहस्थ पंजाबराव डख म्हणुन पुढे आले, आता ते अनेक शेतकऱ्यांच्या गळ्यातले ताईत बनलेल. हवामान अंदाज ही शास्त्रीय क्लिष्ठ प्रक्रीया आहे, असे बुडबुडे येतील आणि मिटतील असं डॉ. साबळे म्हणाले.
panjabrao dakh
नुकतीच सोशल मीडियामध्ये पंजाबराव डख आणि नाशिकच्या एका शेतकऱ्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या ही कॉल रेकॉर्डिंग वेगाने व्हायरल होत असून यामध्ये परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
यामध्ये डख काही कंपन्यांकडून भरमसाठ पैसे घेतात असा आरोप लगावण्यात आला आहे. यामुळे सध्या या रेकॉर्डिंगची मोठी चर्चा आहे. यासंदर्भात मॅक्सकिसानने पंजाबराव डख यांच्याशी प्रतिक्रीयेसाठी संपर्क साधला. परंतू त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सौजन्य – मॅक्स महाराष्ट्र
हे पण वाचा –
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा