Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Panjabrao Dakh Havaman Andaj: सावधान ! 13 ऑक्टोबरपर्यंत ‘या’ भागात अतिमुसळधार पाऊस कोसळणार, पंजाबराव डख यांचा इशारा

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
maharashtra weather panjab-dakh-havaman-andaj-todays

Panjabrao Dakh : रविवारी राज्यात सर्वत्र पावसाची (Rain) उघडीप पाहायला मिळाली. मात्र असे असले तरी आगामी काही दिवस राज्यात पावसाची (Monsoon) शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवला आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यातील विदर्भातील जिल्ह्यासमवेतच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, सोलापूर, कोल्हापुर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजी महाराज नगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, अजूनही परतीचा पाऊस (Monsoon News) राज्यात दाखल झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता राज्यात 5 ऑक्टोबर पर्यंत परतीचा पाऊस दाखल होणे अपेक्षित होते मात्र आज 10 ऑक्टोबर उजाडली तरी देखील परतीचा पाऊस राज्यात दाखल झालेला नाही. यामुळे पावसाचा मुक्काम वाढला असल्याचे सांगितले जात आहे.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 10 ऑक्टोबर पासून ते 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यात मुसळधार तर ती मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

या कालावधीत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असे नाही तर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांच्या मते, 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा मुंबई उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र नाशिक या भागात हलका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात या कालावधीत अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे देखील पंजाबराव यांनी नमूद केले आहे. दरम्यान 13 ऑक्टोबर नंतर राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र असे असले तरी 14 आणि 15 ऑक्‍टोबर रोजी राज्यात हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

15 ऑक्टोबर नंतर मात्र राज्यात पावसाची उघडीप राहणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय येत्या काही दिवसात राज्यात थंडीला देखील सुरुवात होणार आहे. निश्चितच मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या कोसळत असलेला पाऊस खरीप हंगामातील काढण्यासाठी आलेल्या पिकांना निश्चितच घातक ठरत आहे.

मात्र याचा फायदा रब्बी हंगामात होणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. दरम्यान राज्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत. तसेच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे येत्या हंगामात शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता राहणार नसल्याचे सांगितले जात आहे.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon