Panjabrao Dakh Havaman Andaj : शेतकरी बांधवांनो, पंजाबराव डख यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक हवामान अंदाज सार्वजनिक केला होता. त्यांनी महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून ते 24 डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे आपल्या हवामान अंदाजात नमूद केले होते.
पंजाबरावाचा हा हवामान अंदाज जर सत्यात उतरला असता तर शेतकऱ्यांची निश्चितचं डोकेदुखी वाढली असती. मात्र आता पंजाबराव डख यांनी आपला नवीन सुधारित हवामान अंदाज सार्वजनिक केला असून राज्यात आता पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात आता तीव्र थंडी राहणार असल्याचे सांगितले आहे.
पंजाबरावांच्या मते थंडीचे प्रमाण हे आपल्या राज्यात अधिक राहणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपली व आपल्या पिकाची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. थंडीचे प्रमाण अधिक असल्याने वयोवृद्ध तसेच लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
पुढील आठ दिवस राज्यात थंडीची लाट राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेती कामे करताना, रात्री अपरात्री शेतात जाताना, रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी जाताना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. या थंडीच्या तीव्र लाटेमुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.
रब्बी हंगामातील गहू पिकास थंडीचे वातावरण चांगले राहणार असले तरी देखील द्राक्ष सारख्या बागायती पिकांना याचा फटका बसू शकतो. यामुळे निश्चितच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची काळजाची धडधड वाढली आहे.
परंतु पाऊस कोसळणार नाही तसेच हवामान नीरभ्र राहील यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा देखील मिळाला आहे. पण थंडीची तीव्र लाट येणार असल्याचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
हे पण वाचा –
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
- Weather Update: महाराष्ट्रात पाऊस कधी व कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज!
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today