× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

या तारखेला येणार राज्यात मान्सून, राज्यात हवामानाबाबत पंजाबराव डख यांचे मोठे संकेत ! monsoon update

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
panjab dakh monsoon update

monsoon update | देशातील बदलत्या हवामानामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष यंदाच्या मान्सूनकडे लागले असून, यंदा मान्सून कधी दाखल होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून मशागतीचे कामे देखील केली जात आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनो, शेती मशागतीची कामे वेळेत उरकून घ्यावीत, मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे. तर आजपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखील डख यांनी वर्तवली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे एका कार्यक्रमासाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख आले असता त्यांनी आपल्या अभ्यासानुसार यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे सांगितले. तसेच पाऊस कुठं पडतो याची बरीच माहिती उदाहरणांसह सांगितली.

वाचा – पंजाब डख हवामान अंदाज : पेरणी कधी करावी? पहा पंजाबरावांचा १० दिवसांचा अंदाज monsoon 2023 | पावसाचा अंदाज

तर येत्या 22, 23, 24 मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस पडणार असून, जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला देखील पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. तर 8 जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लावून यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना डख म्हणाले की, मी फक्त शेतकऱ्यांचा हितासाठी हवामानाचा अंदाज सांगून पावसामुळे शेतकऱ्यांचे होणार नुकसान टाळण्यासाठी व पुढील नियोजनासाठी सांगत आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी थोडे दिवस राहिले आहेत. त्यांनी लवकरात लवकर शेतीच्या मशागतीची कामे करून खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज राहावे, असेही पंजाबराव डख म्हणाले.

31 मे ते 2 जून दरम्यान राज्यात मान्सून पूर्व पाऊस दणका देणार आहे. या दरम्यान राज्यातील बऱ्याच भागात जोरदार पावसाचे हाजेरी राहील. सध्या राज्यातील शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहे.

पंजाबराव यांच्या माहितीनुसार राज्यात मान्सूनचे आगमन वेळेवरच होणार आहे. राज्यात मान्सून येण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे मान्सूनपूर्व मशागतीला वेग आला आहे.

यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मान्सूनकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी खरीप हंगामात मोठ्याप्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं. त्यातून शेतकरी सावरत नाही तो, रब्बी हंगामात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली.

मार्च, एप्रिल ते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांचा पेरणीसाठी लावलेला खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला असला तरीही अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने येऊ नयेत अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

हे पण वाचा –

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon