Monsoon 2022 : परतीच्या पावासाने राज्यातील अनेक भागात थैमान घातले आहे, सततच्या पावसामुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यादरम्यान राज्यातील नागरिकांची मान्सून पासून सुटका होणार आहे. आज विदर्भाच्या अनेक भागातून मॉन्सून निघून गेला असून पुढील 48 तासांत मॉन्सून देशातून निघून जाणार असल्याची माहिती पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
हवामान उद्या पाऊस
24 तारखेच्या दरम्यान समुद्र किनारी चक्रिवादळ निर्माण होण्याची शक्यताअसून 25 तारखेला चक्रीवादळ आंध्र आणि ओरिसा किनारपट्टीपासून पश्चिम बंगाल, बांग्लादेशकडे जाणार. तर महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम होणार नाही अशी माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
आजचा हवामान अंदाज
दरम्यान आज आणि उद्या कोकण भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटासह पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात ढगाळ वातावरण रहाणार असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा





हवामान अंदाज विदर्भ
सध्या अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दबाचे क्षेत्र आहे, तीन ते चार दिवसात ते तीव्र होणार आणि ते होताना त्याचा प्रवास किनारपट्टीच्या भागाकडे होण्याची शक्यता आहे. सोमवारच्या आसपास ते चक्रिवादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २५ तारखेला ते किनारपट्टीला लागून पश्चिम बंगाल, बांग्लादेशाकडे जाण्याची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे. दरम्यान राज्यात या वादळामुळे कुठलाही इशारा हवामान विभागाने दिला नाही, असे होसाळीकर यांनी सांगितले.
हे पण वाचा –
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा
नाव | Maharashtra Weather Forecast |
---|---|
विभाग | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
दिनांक | 21 ऑक्टोबर 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद