Maharashtra Weather Update : गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात थोडासा बदल पाहायला मिळत आहे. सुरुवातीला राज्यात किमान आणि कमाल तापमानात थोडी घट झाली होती. यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली होती.
पण गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानात थोडीशी वाढ झाली आहे. यामुळे सकाळी-सकाळी थंडीचे वातावरण अनुभवायला मिळत आहे तर दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत.
काही भागात मात्र किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. जळगावचा विचार केला तर जळगाव हे महाबळेश्वरपेक्षा थंड बनले आहे. जळगावच्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
अशातच आता राज्यातील हवामानात पुन्हा एकदा एक मोठा चेंज पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
खरंतर या वर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात यंदा मान्सून काळामध्ये सरासरीच्या तुलनेत 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
म्हणजेच राज्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत फक्त 88% एवढा पाऊस पडला आहे. राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा
राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यात दुष्काळाची झळ अधिक तीव्र आहे. शासनाने या संबंधित तालुक्यांमध्ये दुष्काळ देखील जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना आता शासनाकडून भरीव मदतीची आशा आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम तर प्रभावित झालाच आहे शिवाय आता आगामी रब्बी हंगाम देखील प्रभावित होण्याची शक्यता आहे. म्हणून आता अवकाळी पाऊस का होईना पाऊस बरसला पाहिजे असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
अशातच आता केरळच्या समुद्र किनाऱ्यालगत अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. हवामान खात्याने राज्यातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर तसेच गोव्यात पुढील दोन दिवस हलका पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हलका पाऊस पडेल मात्र खूप मोठा पाऊस पडणार नाही असे देखील आयएमडीने स्पष्ट केले आहे.